सप्रेम नमस्कार.
कार्तिकोत्सव सुरू होण्यापूर्वी “”एक दिवस”” म्हणजे बुधवार दिनांक ०२ नोव्हेंबर २०२२ रोजी “”निशाणकाठी स्थापना”” कार्यक्रम आहे...👍
सुमारे ७७ वर्षांनंतर असा कार्यक्रम होणार आहे…””फाल्गुन शुद्ध १० शके१८६६ म्हणजे सन १९४५ “”मध्ये सध्याची निशाणकाठी स्थापीत झाली होती….
७७ उन्हाळे-पावसाळे सोसून जीर्ण झालेल्या सध्याच्या निशाणकाठीचे विसर्जन करून त्या जागी नवीन निशाणकाठीची स्थापना आपल्या सर्वांच्या उपस्थितीत करायची आहे…**श्रीदेवी मुहूर्ताई मंदिराजवळ श्री.नरेश कांबळींच्या घरानजीक नवीन निशाणकाठीचे सुतारकाम सुरू करून ते अंतिम टप्प्यात आहे…येथून ही नवीन निशाणकाठी वाजतगाजत मिरवणूकीने श्रीदेवाच्या मंदिरात आणायची आहे…
यावेळी लहानथोर, आबालवृद्ध, स्त्री पुरुष, पुणेमुंबईकर मंडळी, आदी सर्वांना या दिवशी उपस्थित रहाता यावे म्हणून हे आमंत्रण देत आहे.”निशाणकाठी स्थापने”च्या कार्यात आपण सर्व साक्षीदार ठरावे, म्हणून आपली उपस्थिती महत्वाची आहे…बारा खोतांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.आपणा सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे.👍🙏
आपला नम्र,
डॉ. मिलिंद देसाई