सप्रेम नमस्कार….
श्री देवाच्या कार्तिकोत्सवाचे आगाऊ निमंत्रण आजरोजी आपल्याला पाठवीत आहे..पुणे-मुंबईकर मंडळींना रेल्वे बुकिंग करणे, एसटी बुकिंग करणे सोयीचे व्हावे म्हणून हे निमंत्रण केले आहे… कोरोनाची नियमावली लक्षात घेता ,कार्तिकोत्सवाला येणाऱ्या १८ वर्षावरील भाविक भक्तांनी लसीकरणाच्या १ अथवा २ मात्रा घेतलेल्या असणे आवश्यक आहे…भक्तनिवासामध्ये भोजन-निवासाची सोय करण्यासाठी आपल्याकडे लसीकरण दाखला असणे बंधनाचे केलेले आहे…ही सूचना अत्यंत नम्रतेने आपल्याला करण्यात येत आहे… गैरसमज नसावा….
श्रीदेवाचा उत्सव आपल्या उपस्थिती शिवाय अधुरा आणि अपूर्ण होईल ,म्हणून आपण अगदी अगत्यपूर्वक उत्सवाला येण्याचे नियोजन करावे….हे “”निमंत्रण “” सर्व भाविक भक्तांपर्यंत ,मित्रमंडळींपर्यंत पोहोचवण्यासाठी आपणही प्रयत्न करावेत….धन्यवाद!!!
आपला नम्र,
डॉ. मिलिंद देसाई