मित्रांनो…सन २००२ /०३ ते २००४/०५ सालामध्ये मिठगवाणे ग्रामपंचायतीमध्ये मी केवळ दोन वर्षांसाठीच सहभाग घेतला होता… “कहाणी” त्यावेळची..….ग्रामीण यात्रास्थळ विकासाचा निधी असतो ,हे ग्रामपंचायतीत गेल्यावर समजले होते….. कामाला सुरुवात… चौकशी करणे सुरू झाले…माझे सहसाथी श्री.बलवंत सुतार व तत्कालिन ग्रामसेवक श्री.पी.डी.पवार हे दोघेही या चौकशीच्या कामात लागले… अनेक कागद लिहीले गेले, श्री.बलवंत सुतारांनी रत्नागिरी पर्यंत पोचते केले पण बरेचसे निरुपयोगी ठरले…. राजकीय साथ आमचे सोबत नव्हती……प्रयत्न करुन करून एक कागद यशस्वी झाला…… अंजनेश्वर मंदीरास “क” वर्ग यात्रास्थळाचा दर्जा मिळाला… कोकण पदवीधर आमदारचे डॉ.अशोकराव मोडक यांनी आम्हाला मनस्वी साथ दिली….. (तालुक्याचे नेतृत्व त्यावेळी आमच्या वर रुसलेलेच होते…. आम्ही ग्रामपंचायतीत गावपॅनल ठोकून आणले म्हणून…*आमच्या प्रयत्नांना त्यांची ‘साथ’ मिळालेली नव्हती…)असो. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.