दोन शब्द
नमस्कार, सर्व भाविक भक्तांना नमस्कार. “www.shridevanjaneshwar.com” या नावाने वेबसाईट चालू करताना खूप खूप आनंद होत आहे. श्री.मंदार परांजपे व श्री.अतुल जोशी या दोघांनी विशेष परिश्रम घेऊन ही वेबसाईट डिझाईन केली आहे. मला खात्री आहे की या वेबसाईटच्या माध्यमातून अगदी थोडक्या कालावधीमध्ये श्री देव अंजनेश्वर ची प्रसिध्दी, देवस्थानच्या एकूण कारभाराची माहिती जगभरातील भाविक भक्तांच्या नजरेच्या टप्प्यात येणार आहे. या वेबपोर्टलच्या माध्यमातून भाविक भक्तांना आपली देणगी थेट श्री देवाच्या बॅंकखात्याला जमा करता येणार आहे व त्याची जमापावती लगेच उपलब्ध होणार आहे.देवस्थान उत्सव, उत्सव कालावधीतील विविध धार्मिक, सांस्कृतिक, परंपरागत कार्यक्रमांची माहिती,देवस्थान मधील सोयीसुविधा, रहिवास व्यवस्था आदीची माहिती सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाईट उपयुक्त ठरणार आहे.देवस्थानशी थेटपणे संवाद साधण्यासाठी, कार्यक्रमांचे व्हिडिओ , फोटो,पाहण्यासाठी सुध्दा ही वेबसाईट अगदी उपयुक्त होणार आहे. तरी सर्वांनी ह्या वेबसाईट ला जरुर भेट द्या,अशी प्रेमाची आणि आग्रहाची विनंती करुन इथले “दोन शब्द” इथेच थांबवतो.
डॉ.मिलिंद देसाई, विश्वस्त, श्री देव अंजनेश्वर कसबा, मिठगवाणे, ता.राजापूर जि.रत्नागिरी
मुक्काम कसबा – मिठगवाणे गावाची माहिती
मिठगवाणे हे नाव पडण्याचे कारण, येथे पुरातनकाळी मिठागरे होती. या गावापासून जवळच विजयदुर्ग बंदर असून तेथे फार पुरातन किल्ला आहे. विजयदुर्ग बंदरापासून समुद्राचे एक फासू या गावाच्या परिसरात पसरलेले होते. त्यांतून लहान लहान होड्या-मचवे ये जा करीत असत. निसर्गाने हे फासू बंद झाल्यामुळे येथील मिठागरे बंद होऊन फक्त मिठगवाणे एवढे नावच शिल्लक राहिले आहे. या गावात पुरातन काळापासून हिंदू आणि परधर्मीय सर्व लोक सलोख्याने राहात आले व आजही राहात आहेत. या गावाच्या पूर्वेला साधारण डोंगर पायथ्याशी श्रीदेव अंजनेश्वराचे भव्य देवालय आहे. हे देवालय म्हणजे या गांवचे एक आल्हाददायक व प्रेक्षणीय असे स्थान आहे.